अक्षय आणि जॉन झळकणार एकत्र

आगमी काळात येत असलेल्या हॉलीवुडच्या ‘एस्केप प्लैन’ च्या हिंदी रीमेकमध्ये आता खिलाड़ी कुमार म्हाणजेच अभिनेता अक्षय कुमार आणि माचोमैन जॉन अब्राहम मुख्य भूमिका करताना दिसणार आहे. अक्षयकुमार- जॉन या दोघांची जोडी आता प्रेक्षकांना कितपत पसंत पडणार हे पाहण्यासाठी आता हा सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहवी लागणार आहे.

काही दिवसांपूवीच रिलीज झालेले हॉलीवुडचा सिनेमा ‘एस्केप प्लैन’ मध्येह आर्नल्ड स्वाजनेगर आणि सिल्वेस्टर स्टैलॉनने मुख्य भूमिका केली होती. आगामी काळात येत असलेल्या पी.वी.आर पिक्चर्सच्या हिंदी रिमेकसाठी ‘एस्केप प्लैन’ चे राइटस खरेदी करण्यासाठी प्रयत्नन सुरू आहेत. या सिनेमाच्या शुटिंगचे काम पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.

पी.वी.आरच्या ‘एस्केप प्लैन’ च्या‍ हिंदी रीमेक साठी अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांची निवड करण्यात आली असल्यचे समजते. पी.वी.आर पिक्चर्सच्या मतानुसार या सिनेमातील आर्नल्ड स्वाजनेगर आणि सिल्वेस्टर स्टैलॉन यांची अॅक्शन हीरोची भूमिका ख-या अर्थाने बॉलीवुडमधील अक्षय-जॉन यांची जोडीच साकर करू शकते. त्यांची इमेज देखील या भूमिकेशी मिळती-जुळती आहे. त्यामुळे येणा-या काळात आता ही जोडी कशी यशस्वी होते हे पाहणे औत्सुतक्याचे ठरेल.