ऑस्ट्रेलियात संशोधकांना सापडली सोन्याची झाडे

मेलबर्न – आजपर्यंत केवळ परिकथातून आपण सोन्याच्या झाडांबद्दल ऐकले आहे मात्र आता परिकथेतील ही झाडे प्रत्यक्षातही असल्याचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेतील शास्त्रज्ञ संशोधक मेल्वन लिटर्न यांनी झाडांच्या पानात असलेल्या सोन्याचा शोध लावला आहे.

पर्थ भागातील निलगिरीच्या झाडांच्या पानात सोन्याचे कण संशोधकांना सापडले आहेत. या शोधामुळे भविष्यात या मौल्यवान धातूचा खजिना शोधण्यातही मदत मिळू शकणार आहे. या संदर्भात माहिती देताना मेल्वन म्हणाले की जी झाडे जमिनीत खोलवर सोने साठे असलेल्या जागी वाढतात त्यांची मूळ खोलवर रूजलेली असतात. पाणी टंचाईच्या काळात ही मूळे जमिनीत आणखी खोलवर जातात व जमिनीतील सोन्याचे कणही पाण्याबरोबर शोषून घेतात. झाडांच्या पानात सोने सापडेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती पण पानांत सोन्याचे कण सापडल्याने आमचा हा शोध अद्भूतच म्हणावा लागेल.

ज्या झाडांच्या पानात सोने आढळले आहे त्या झाडांनी हे कण जमिनीतून ३० मीटरपेक्षा अधिक खोलातून शोषले आहेत असेही मेल्वन म्हणाले. याचाच अर्थ ज्या झाडांच्या पानात सोने आढळेल तेथे खोलवर जमिनीत सोन्याचे साठे असणार हे नक्की झाले आहे.

Leave a Comment