चतुरस्त्र गायक

हिंदी चित्रपटसृष्टीत १९४५ पासून १९८९ पर्यंत साडे तीन हजार गाणी गायलेले आणि त्यातली बहुसंख्य गाणी अजरामर केलेले चतुरस्त्र गायक मन्ना डे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पत्नी सुलोचना यांचे २०१२ च्या जानेवारीत निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर दोन वर्षाच्या आतच मन्ना डे यांचे निधन झाले. जून २०१३ मध्ये ते अत्यवस्थ झाले होते आणि त्यांच्या मृत्यूची अङ्गवासुध्दा पसरली होती. डॉक्टरांनी अङ्गवेचे निरसन केले आणि नंतर पाच महिन्यांनी काल मन्ना डे यांनी शेवटचा श्‍वास घेतला. बंंगाली चित्रपट उद्योगातून हिंदी चित्रपटात प्रवेश केलेल्या प्रबोधचंद्र डे ऊर्ङ्ग मन्ना डे यांचे काल निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पदार्पणाच्या काही चित्रपटात धार्मिक स्वरूपाची आणि वयस्कर पात्रांची गाणी गाणार्‍या मन्ना डे यांना सुरूवातीला तरी बुजूर्ग आवाज असे म्हटले जात असे. कारण त्यांच्या वाट्याला चित्रपटातील नायकांच्या नव्हे तर वृध्द पात्रांची गाणी येत असत. त्यांना १९५० च्या आधीच्या चित्रपटांमध्ये अशीच गाणी मिळत गेली आणि त्यासोबतच हास्य कलाकारांची गाणी मिळत गेली. या गोष्टीचे त्यांना वाईटही वाटत असे. मात्र त्यांनी पदार्पणातच रामराज्य चित्रपटातून गायला सुरूवात केली होती आणि आपला आवाज त्यांनी वाल्मिकी ऋषींची भूमिका वठवणार्‍या पात्रासाठी दिला होता.

पुढे त्यांनी शृंगारिक गाणी मोठ्या प्रमाणावर गायिली आणि त्यांना विविध चित्रपटांच्या नायकांसाठी आवाज देण्याची संधी मिळाली. मात्र सुरूवातीच्या ह्या काळात त्यांच्यावर एक विचित्र जबाबदारी पडली होती. चित्रपट सृष्टीत त्यांच्या बरोबरच प्रवेश केलेल्या परंतु नंतर हे जग गाजवणार्‍या मोहम्मद रङ्गी यांना शृंगारिक गाणी शिकवण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र मशाल या चित्रपटातून त्यांची ही ख्याती बदलली आणि पुढे त्यांनी शृंगारिक गाण्यासह अनेक प्रकारच्या गाण्यांना आवाज दिला. मन्ना डे यांचे घराणे गायकांचे घराणे होते. त्यांचे चुलते कृष्णकुमार डे हे अंध गायक होते आणि त्यांना संगिताचार्य अशी पदवी मिळाली होती. म्हणजे मन्ना डे यांना सुरूवातीच्या काळात संगीताची प्रेरणा आपल्या कुटुंबातूनच मिळाली आणि नंतर ते आंतर महाविद्यालयीन गायन स्पर्धांमधून चमकले आणि पुढे त्यांचे करीअर घडले. १९४२ साली ते चित्रपटसृष्टीत नाव काढण्यासाठी आपल्या काकांसोबत मुंबईत आले आणि सुरूवातीच्या काळात सचिनदेव बर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पार्श्‍वगायक म्हणून त्यांनी आपले करीअर सुरू केले.

१९५२ सालपर्यंत ते बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील गाणी म्हणत असत. मात्र ५२ साली त्यांनी मराठीतल्या अमरभूपाळी या चित्रपटात गाणी गायली. वास्तविक स्वतंत्रपणे मराठी गायक होण्याची त्यांची इच्छाही नव्हती आणि ते मराठी भाषिकही नव्हते परंतु अमरभूपाळी हा चित्रपट मराठी आणि बंगाली अशा दोन्ही भाषांत निघाल्यामुळे त्यांना मराठी अमरभूपाळीत गाण्याची संधी मिळाली. सचिनदेव बर्मन यांच्याशिवाय अनिल बिस्वास यांनी मन्ना डे यांना खूप संधी दिली. त्यांनी सुरूवातीच्या काळात महात्मा कबीर, हम भी इंसान है, दो सितारे, परदेसी, जासूस इत्यादी चित्रपटांसाठी आवाज दिला. मन्ना डे यांच्या आवाजाने शृंगारिक वळण घेतले ते राजकपूरच्या आवारा चित्रपटातून. आवारा चित्रपटाची निर्मिती करून राजकपूरने एक क्रांती केली होती. त्या काळात राजकपूर निर्माता दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीत धाडसी पणाने शृंगारिक दृश्ये दाखविणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या चित्रपटात मन्ना डे यांनी लता मंगेशकर सोबत शृंगारिक गाणी म्हटली. हिंदी चित्रपटसृष्टीत शृंगारिक चित्रपटांचा जमाना सुरू होत असतानाच मन्ना डे यांच्या गायकी कारकिर्दीनेसुध्दा शृंगारिक वळण घेतले. मुळात मन्ना डे यांचे शिक्षण शास्त्रीय संगीताचे होते. पण त्यांनी शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीताला प्राधान्य दिले आणि त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रवास गाजला.

ए रात भीगी भीगी, चोरी चोरी, तेरे बिना आग यह चांदनी ही गाणी तर अजरामर ठरली आहेत. राजकपूर आणि मन्ना डे यांचा सहयोग दीर्घकाळ टिकला. राजकपूरच्या मेरा नाम जोकर मधील गाण्यांबद्दल मन्ना डे यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. शंकर जयकिशन यांची गाणी रागदारीवर आधारलेली असल्यामुळे मन्ना डे यांनी त्यांच्या सोबत केलेल्या गाण्यांना चांगलाच न्याय दिला. १९५१ ते १९६१ त्यांचे साहचर्य राहिले. याच काळात मन्ना डे यांना भीमसेन जोशी यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळाली आणि त्यांची ती गाणी बरीच गाजली. मेरी सुरत तेरी आँखे या चित्रपटातील सारी गाणी रागदारीवर आधारलेली असल्यामुळे मन्ना डे यांना ती छान संधी वाटली आणि तो चित्रपट मन्ना डे यांच्या गाण्यामुळे गाजला. त्यांची गायकी चतुरस्त्र होती. शोले, बुढ्ढा मिल गया, उजाला, सङ्गर या चित्रपटातल्या त्यांच्या गाण्यांना तर पॉप संगीताचा बाज होता आणि ती गाणी गाताना आपण किती अष्टपैलू गायक आहोत हे त्यांनी दाखवून दिले. श्री ४२० या चित्रपटातही मुड मुड के ना देख, प्यार हुआ इकरार हुआ ही गाणी त्यांनी गायली ती ५० वर्षानंतरसुध्दा ताजीतवानी वाटतात. पडोसन मधील एक चतुर नार करके सिंगार हे त्यांचे गाणे तर अजरामर झालेले आहे.