महिला आयुष्यभरात करते दीडशे वेगवेगळ्या हेअर स्टाईल

मुंबई – महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगळ्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.

या अभ्यासासाठी दोन हजार महिलांच्या केशरचन आणि केसांबद्दलच्या आवडीनिवडी अभ्यासण्यात आल्या. त्यामध्ये हेअरड्रेसरकडे जाताना प्रत्येक वेळी नवी केशरचना असावी अशी 20 पैकी एका महिलेची इच्छा असते. 50 टक्के महिलांना केशरचनेबाबत विविध प्रयोग करायला आवडते. महिलांना दोन नव्या हेअर स्टाइल करायला आवडतात. शिवाय वर्षातून एकवेळ केसाचा रंग बदलण्यास त्या प्राधान्य देतात.

15 ते 65 वयादरम्यान 100 वेळा केसांचा रंग बदलला जातो. कंटाळा आला म्हणून बदल करणार्‍या महिलांचे प्रमाण 64 टक्के आहे. सेलिब्रिटींसारखी हेअर स्टाईल असावी म्हणून त्यात बदल करणार्‍या महिलांचे प्रमाण 12 टक्के आहे तर विवाहासाठी केशरचना बदलणार्‍या मुली, महिलांचे प्रमाण 15 टक्के आहे. 100 पैंकी 13 महिला अपत्यप्राप्तीनंतर केशरचना बदलतात. नवा लूक दिसण्यासाठी वाढदिवस व ब्रेकअप हे महिलांसाठी निमित्त ठरते. महिला वर्षाकाठी पाच वेळा हेअर ड्रेसर्सकडे जातात, असे टोनी अँड गाय स्टाइलिस्ट’ने केलेल्या अभ्यासात नमूद केले असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment