कांदिवली क्रीडा संकुलाला गावसकरांच्या नावासाठी आग्रह

मुंबई: शिवसेना कांदिवली क्रीडा संकुलाला सुनील गावसकरांचे नाव देण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. मे महिन्यात शिवसेनेचे कार्यघ्यक्ष उद्धव ठाकरें यांच्यावतीने मिलींद नार्वेकरांनी एमसीए पत्र लिहून सुनील गावस्कर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. गेल्याी काही दिवसांपासून एमसीएने या क्रीडा संकुलाला सचिन तेंडूलकराचे नाव देण्याची मागणी केली आहे.

एमसीकडून सचिन तेंडुलकरचे नाव पुढे आल्याने शिवेसना आक्रमक झाली असून सभागृह नेते यशोधर फणसे यांनी पालिकेच्या संमतीशिवाय क्रीडा संकुलाला नाव देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावसकरांचे नाव पुढे करण्यासाठी शिवसेनने ही भूमिका घेतली असल्याफचे बोलले जात आहे.

मात्र सचिनच्या नावाला विरोध करुन शिवसेनेला जनतेचा रोष पत्करायचा नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या परवानगीचे कारण पुढे करण्यात आल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे कांदिवली क्रीडा संकुलाच्या नामकरणाचा वाद आणखी वाढला आहे. येत्या काळात या क्रीडा संकुलाला कोणचे नाव लावले जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment