स्वार्थी आहे विद्या बालन

बॉलीवूडची डर्टी गर्ल विद्या बालन शूटिंग, प्रचार, जाहीरातीमध्ये जरी व्यास्त असली तरी या बिजी शेडयूलमधूनही स्वतासाठी वेळ काढण्यात स्वार्थी आहे. या कामातून पण आराम करण्यासाठी ती काहीसा वेळ राखून याची कबूली तिने स्वताहून प्रसारमाध्यामांना दिली आहे.

याबाबत बोलताना अभिनेत्री विद्या म्हणाली, ‘सिनेमाच्या शेडयूलमुळे तसे पाहिले तर मी नेहमीच बिजी असते. मात्र या व्यस्त कामातूनपण पण मी थोडासा वेळ काढून आराम करते. यामुळे मला फ्रेश वाटते. मी वेळ राखून ठेवण्याच्या बाबतीत मी माझा स्वार्थ पाहत असते. या काढलेल्या वेळेत मी कुंटूबालापण थोडा वेळ देते त्याशिवाय मी डायरी लिहते व संगीत ऐकत असते. त्यामुळे मी नेहमीच तणावमुक्ता असते.’

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री विद्या फिल्मकार फरहान अख्तरसोबत ‘शादी के साइड इफेक्ट्स’ सिनेमा करीत आहे. त्याशिवाय विद्याने आगामी काळात येत असलेल्या‍ ‘महाभारत’ या अॅनिमेशन सिनेमात द्रौपदीच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे.