सलमानला ‘नको पैसा… हवी समाजसेवा ……

आजवर आपण पैसा, प्रसिद्धी, मान भरपूर मिळवला असून ज्या समाजात आपण राहतो. त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. याचसाठी आपल्या कमाईतील काही भाग समाजाला देण्याची इच्छा असल्याचे मत अभिनेता सलमान खानने एका मुलाखतीत व्यक्त केले. त्याच्या या वक्तव्यामुळे सलमानला आता ‘नको पैसा… हवी समाजसेवा…’ अशी भावना झाल्याची झाल्याची चर्चा होत आहे. सन 2009 मध्ये त्याने ‘बिइंग ह्यूमन’ ही संस्था स्थापन केली.

या माध्यमातून कपड्यांची विक्री करण्यात येते. मुंबई, अहमदाबाद आणि लुधियाना येथे संस्थेचे शोरूम आहेत. या दुकानातील नफ्यातील ठराविक रक्कम वृद्धाश्रम, सामाजिक संस्था आणि गोरगरिबांसाठी देण्यात येते. या संस्थेने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी शेकडो पाण्याच्या टाक्या पाठवल्या होत्या. बिइंग ह्यूमन ही संस्था बॉलिवूडमधील कामगार, तंत्रज्ञ यांना मदत करते. मात्र, काळविटांची शिकार, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे, ‘हिट अ‍ॅण्ड रन केस’ आणि शाहरुखसह अन्य अभिनेत्यांशी झालेली त्याची भांडणे, यामधून इमेज बिल्डिंगसाठी सलमान समाजसेवा करत असल्याचा आरोपही त्याच्यावर होत असतात.

Leave a Comment