सचिनच्या आईसाठी वानखेडेवर खास रॅम्प

मुंबई – क्रिकेट देव सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडिअमवर होणा-या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेत आहे. त्यामुळे सचिनच्या सेंड ऑफची वानखेडेवर जोरदार तयारी सुरू आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे. त्याजमुळे सचिनच्या आईसाठी वानखेडेवर खास रॅम्प तयार करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

गेल्या काही दिवसंपासून वानखेडे मैदानावर सचिन तेंडूलकर जोरादार सराव करती आहे. आागमी काळात तो रणजी सामना खेळत असल्याने त्याची ही तयारी सुरू आहे. त्यासोबतच त्याच्या आईसाठी सुरु असलेल्या खास रॅम्प तयार करण्याच्या कामावर सचिनचे लक्ष आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली शेवटची कसोटी आपल्या आईला बघता यावी यासाठी वानखेडे स्टेडियमवरच्या `प्रेसिडेंट बॉक्स`पर्यंत आईला व्हील चेअरवरून आरामात नेता यावे, यासाठी प्रवेशद्वारापासून या बॉक्सपर्यंत रॅम्प बनवण्याची विनंती त्याने एमसीएला केली आहे. मुंबई रणजी संघासोबत सराव करण्यासाठी सचिन तेंडुलकर सोमवारी वानखेडे स्टेडियमवर आला होता. त्यावेळी सचिनन मुंबई क्रिकेट असोसिएनच्या पदाधिका-यांशी रॅम्पबाबत चर्चा केली. तेव्हा, एमसीएने त्याला सध्याच्या तात्पुरता रॅम्प दाखवला. पण तो त्याला फारसा आवडलेला नाही. त्यामुळे त्यात लवकरच सचिनच्या सूचनेप्रमाणं बदल केले जाणार असल्याचं समजते.

Leave a Comment