मुंबईत परदेशी मॉडेलची छेडछाड

मुंबई : भारतात महिला सुरक्षीत नाहीत हे पुन्हा एकदा सिध्दा झाले आहे. मुंबईतील ओशवारा परिसरात परदेशी मॉडेलशी गैरवर्तन केल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ओशिवारा परिसरात घडला. याप्रकरणी परदेशी मॉडेलने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

ब्रिटीश नागरिक असलेली ही मॉडेल काल आपल्या काही मैत्रिणींसह ओशिवरा भागात जात होती. त्यावेळी गौरव गुप्ता नावाच्या एका युवकाने रात्रीच्या वेळी या मॉडेलची छेड काढली. ही महिला बॉलीवूडमध्ये साईड अॅक्टार म्हणून काम करीत असल्याचे समजते. रात्रीच्यावेळी छेड काढल्याने मॉडेलनं छेडछाडीचा प्रतिकार केला.

यावेळी या मॉडेलच्या सोबत असलेल्या दुस-या मॉडेलनं आरडाओरडा केला. आरडाओरड केल्याने पळून जान्याच्या प्रयत्नात असलेल्या गौरवला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्या त आला आहे. गौरवने छेडछाडीचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.