योगगुरू रामदेवबाबाच्या भावाविरूध्द गुन्हा

हरिद्वार: गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्यापुढील अडचणीत वाड होताना दिसत आहे. बाबा रामदेव यांचा भाऊ राम भरत यांच्यावर अपहरणाचा आरोप आहे. नितीन त्यागी या इसमाचे अपहरण झाले होते, उत्तराखंड पोलिसांनी बाबा रामदेव यांच्या पतंजली योग पीठात टाकलेल्या धाडीत नितीन त्यागी यांची सुटका करण्यात आली. यानंतर राम भरत यांच्यासह एकूण पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बाबा रामदेव यांचा भाऊ राम भरत मात्र फरार आहे.

आरोपांनुसार नितीन पतंजलीत काम करत होता, काही दिवसांपूर्वी नितिन यांनी ते काम सोडलं होतं, यावर रामदेव यांचे भाऊ राम भरत नाराज होते. नितिन त्यागी यांना मारहाण करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. उत्तराखंड पोलिसांनी बाबा रामदेव यांच्या पतंजली योग पीठात टाकलेल्या धाडीत नितीन त्यागी यांची सुटका केली होती.

आरोपांनुसार पोलिसांच्या छाप्यात सोडवण्यात आलेल्या नितिन त्यागी यांचे राम भरत आणि त्यांच्या सुरक्षा गार्डसने तीन दिवसाआधी अपहरण केले होते. नितीनच्या नातेवाईकांनी याबाबतीत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले. यानंतर राम भरत यांच्यासह एकूण पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.