आगामी काळात येत असलेल्याा अभिनेता हतिक रोशनच्याा ‘क्रिश ३’ या सिनेमात मीच नायिका म्हमणून काम करीत असल्याेचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सांगितले. ‘क्रिश ३’ या सिनेमात प्रियांका चोप्रा व कंगना राणावत यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असल्याचे प्रियंकाने सांगितले.
याबाबत बोलताना अभिनेत्री प्रियांका म्हणाली, कंगना राणावत हिने सुरूवातीला या सिनेमामध्ये काम करण्यास नकार दिला होता. प्रियांका सोबत काम करण्यास ती तयार नव्हती. कंगनाच्या आधी जॅकलिन फर्नांडिस व चित्रांगदा सिंह यांनी देखील ‘क्रिश ३’ सिनेमामध्ये प्रियांका सोबत काम करण्यास नकार दिला होता. ही भूमिका जबरदस्त आहे. या चित्रपटाची नाय़िका मीच आहे. या चित्रपटामध्ये मी हृतिक याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे
कंगनाने साकारलेली भूमिका महत्त्वपूर्ण आणि अद्भूत आहे. त्या भूमिकेमध्ये खरेपणा आहे. मला संधी मिळाली असती तर मी नक्कीच ती भूमिका साकारली असती. कंगना ने ही भूमिका साकारली याचा मला आनंद आहे. तीने या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. हिंदी सिनेमामध्ये ही अत्यंत नवखी भूमिका असल्याचे प्रियांकाने सांगितले.