दीपिका, शाहरूखने मारली बाजी

नुकताच टाइम सेलेबेक्सच्याावतीने सर्वेक्षण करण्यानत आले आहे. त्या मध्ये अभिनेत्यात शाहरुख खानने तर अभिनेत्रीमध्ये दीपिका पादुकोनने बाजी मारली. अभिनेता सलमान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि जॉन अब्राहमला मागे टाकले आहे. ऑगस्टमध्ये करन्यात आलेल्या सर्वेनुसार शाहरूखला ७६ गुण मिळाले. तर सलमानला ४२ गुण मिळाले. अभिनेता अक्षय कुमारला ३९ तर अमिताभ बच्चनला ३३ व जॉन अब्राहमला २८ गुण मिळाले.

अभिनेत्रीमध्ये दीपिका पादुकोण नंबर एक क्रमांकावर राहिली. दीपिकाला सर्वाधिक ६१ गुण मिळाले.या सर्वेमध्ये सातवेळेस अभिनेत्री दीपिका एक नंबर राहिली आहे. तिच्या तुलनेत अभिनेत्री कटरीना कैफला ३१ तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ३१ गुण मिळाले. तिस-या क्रमांकावर अभिनेत्री करीना कपूर असून तिला ३० गुण मिळाले आहेत.

तिच्याक तुलनेत प्रियंका चोप्राला २७ गुण घेवून पाचव्या् स्थानावर आहे.टाइम्स सेलेबेक्स वेबसाईट ही बॉलीवुडमधील बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या सिनेमाची सोशल नेटवर्किंग साइट आणि इंटरनेटवरील सक्रियता पाहून गुण देत असते.

Leave a Comment