दीडशे अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

जम्मू – जम्मू जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जवानांवर सीमेपलीकडून पाकिस्तानी रेंजर्सनी कारण नसताना गोळीबार करून पुन्हा एकदा संघर्षविरामाचे उल्लंघन केले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे उल्लंघन केले जाण्याची ही गेल्या चार दिवसांतील आठवी घटना आहे.

जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेनजिक असलेल्या आर. एस. पुरा सेक्टरमधील खारकोला सीमावर्ती चौकीजवळ सकाळी 9.30 च्या सुमारास काही जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे बीएसएफच्या निदर्शनास आले. बीएसएफच्या जवानांनी पोझिशन घेऊन संशयास्पद हालचाली करणा-यांना आव्हान दिले. मात्र, याचदरम्यान पाकिस्तानी रेंजर्सनी अकारण गोळीबार सुरू केला, असे बीएसएफच्या एका अधिका-याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले.

Leave a Comment