गेले सोळा दिवस अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला दररोज १.५ अब्ज डॉलर्स या हिशोबाने तब्बल २४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला असल्याचे स्टँडर्ड अॅन्ड पुअर एजन्सीने जाहीर केले आहे. ओबामा सरकारला अमेरिकेसाठी कर्ज मुदत वाढ मिळविण्यात अखेर बुधवारी यश आल्यानंतर हा १६ दिवसांचा शटडाऊन समाप्त झाला असून या काळात घरी पाठविण्यात आलेले लक्षावधी कामगार पुन्हा कामावर परतले आहेत.
अर्थात ओबामा प्रशासनाने कर्ज मुदत वाढीसाठी घेतलेली मान्यता हा शटडाऊन ताप्तुरता बंद होण्यापुरतीच मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. या शटडाऊनच्या काळात सरकारी सेवेत ३.१ अब्ज डॉलर्स, प्रवास खर्चापोटी दररोज १.५२ कोटी र्डालर्स, नॅशनल पार्क बंद राहिल्यामुळे दररोज ७६ दशलक्ष डॉलर्स, फेडरल कॉट्राक्टर पगारापोटी एकट्या वॉशिंग्टन डिसी मध्येच दररोज २.१७ कोटी डॉलर्स असे नुकसान सोसावे लागले आहे.