नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्रिनिदाद टोबॅगो संघावर सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. आज चॅम्पी्यन्स लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स-राजस्थायन रॉयल लढत होणार आहे. यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्समने बाजी मारली होती. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होणार याकडे लक्ष लागले आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स समोर १५४ धावांचे लक्ष्य त्रिनिदादच्या संघाने ठेवले होत. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ९० धावांची भक्कम सलामी मिळाल्याने हे आव्हान सहज पार केले. ड्वेन स्मिथने ५९, सचिन तेंडुलकरने ३५, तर कर्णधार रोहित शर्माने २५ धावा केल्या. दिनेश कार्तिकने नाबाद ३३ धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
मास्टर-ब्लासटर सचिनने आपल्या कारकिर्दीतील पन्नास हजार धावा या सामन्यात पूर्ण केल्या. हे या सामन्याचे खास वैशिष्ट्य ठरले. अशी कामगिरी करणारा सचिन पहिला आशियाई खेळाडू आहे. त्याआधी एविन लुईसने ६२ धावा आणि यानिक ओटलेच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीमुळे त्रिनिदाद अँड टोबॅगोने निर्धारीत २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारली.