नवी दिल्ली- आसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. सुरतमधील दोघा बहिणींनी आसाराम बापू आणि त्यांचा पूत्र नारायण साई यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आसाराम बापूंच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा आरोप या दोघा बहिणींनी केला आहे. दहा वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती.
या बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर आसाराम बापूंनी बलात्कार केला होता तर लहान बहिणीवर नारायण साईने बलात्कार केला होता अशी तक्रार या दोघा बहिणींनी केली आहे. दहा वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती मात्र भीती पोटी त्यांनी याची कोठेही वाच्यता केली नव्हती असे म्हटले आहे.
आसाराम बापू यांनी जोधपूरमधील आश्रमात एका अल्पवयीन मुलींने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. त्यासंबंधी १९ ऑगस्टला तिने आपल्या वडिलांसोबत जावून दिल्लीतल्या कमलानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यानंतर आसाराम बापू विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या आसाराम बापूंचा जामिन अर्ज फेटाळल्यामुळे ते जेलमध्येच आहेत.