ओव्हरीवर शस्त्रक्रिया करून अपत्य प्राप्ती

वॉशिंग्टन – अपत्य प्राप्तीस अपात्र ठरणार्‍या महिलांच्या ओव्हरीवर (बीजकोश) शस्त्रक्रिया करून त्यांना अपत्य प्राप्ती करून देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. जपानमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला यश आल्यानंतर दुसरीही तशीच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती सुद्धा यशस्वी झाली. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस् या संस्थेच्या मासिकात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हा प्रयोग अजून प्राथमिक अवस्थेत आहे. परंतु तो यशस्वी ठरू शकतो आणि त्यातून मुले न होणार्‍या महिलांना दिलासा मिळू शकतो, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेषत: ज्या महिलांमध्ये सरासरी वयाच्या आधीच रजोनिवृत्तीची अवस्था येते अशा महिलांना अपत्य प्राप्ती करून देण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरू शकतो.

सध्या महिलांच्या जीवनामध्ये ताण-तणाव आणि धकाधकी यामुळे रजोनिवृत्ती अवस्था पस्तीशीतच यायला लागली आहे, अशा महिलांना मुले होत नाहीत आणि विवाह उशीरा होत असल्यामुळे त्यांच्या अपत्य प्राप्तीचे वय हेच असते. त्यामुळे अशा महिलांना उपचाराची गरज होती. ती या शस्त्रक्रियेने पूर्ण होऊ शकते.