एमसीएच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना उमेदवारी

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीसाठी बाळा म्हाडदळकर गटाकडून अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आलं आहे. माजी अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांसमोर विद्यमान अध्यक्ष रवी सावंत उभे राहून जिंकले होते.

म्हाडदळकर गटाने रवी सावंत यांनाही कार्यालयीन अधिकारी उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर पवारांचे खास मर्जीतील डॉ. रत्नाकर शेट्टी यांचे नाव मात्र या यादीत नाही. एमसीएची बहुचर्चित निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे. एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांच्या नेतृत्वाखालील महाडदळकर गटाच्या पॅनलची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यात शरद पवारांना या पॅनलतर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली असून १६ जणांचे हे पॅनल आहे. या पॅनलतर्फे पवारांना थेट उमेदवारीच देण्यात आल्यामुळे या निवडणुकीत या पॅनलचा चांगलाच वरचष्मा राहणार हे स्पष्ट झाले आहे.

म्हाडदळकर गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे अध्यक्ष : शरद पवार. कार्यालयीन अधिकारी : रवी सावंत, आशिष शेलार, विनोद देशपांडे, डॉ. पी.व्ही. शेट्टी आणि नितीन दलाल. व्यवस्थापकीय समिती : दीपक पाटील, अरविंद कदम, श्रीकांत तिगडी, गणेश अय्यर आणि राजन फातरफेकर.

Leave a Comment