राजस्थानचे मंत्री पक्षातून निलंबित

जयपूर – राजस्थानचे कॉंग्रेस पक्षीय मंत्री बाबूलाल नागर यांना बलात्काराच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. एका पस्तीस वर्षीय महिलेवर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. आता त्यांना पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका महिलेने श्री. नागर यांच्यावर बलात्काराचा आरोप करताच पक्षाच्या राज्य समितीने वैद्यकीय पथकाला त्यांची तपासणी करण्याचा आदेश दिला. या पथकाने त्यांच्या विर्याचे नमुने जमा केले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. नागर हे दुग्ध व्यवसाय, खादी आणि ग्रामीण उद्योगमंत्री होते.

५३ वर्षीय वयाचे श्री. बाबूलाल नागर यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. आपल्या राजकीय विरोधकांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचला असल्याचा त्यांचा आरोप आहे.