मुंबई: गोरेगावातील आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चार वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिद्धार्थ रुग्णालयात या जखमी झालेल्या मुलीवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे आरे कॉलनीत या चार वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता.
गोरगाव परिसरातील आरे कॉलनीत राहत असलेल्याज चार वर्षिय मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यापमध्ये ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारसाठी तातडीने नजीकच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ११ वाजण्यच्या सुमरास या मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टंरानी दिली.
आरे कॉलनी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहे. दरम्यान, या परिसरातील बिबट़याचा पोलिस व नागरिक शोध घेत आहेत. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.