अभिषेक-ऐश्वर्या एकत्रित झळकणार

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी अभिषेक-ऐश्वर्या काही वर्षांपासून एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. आता लवकरच अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉय-बच्चन एका जाहिरातीच्या माध्यामातून एकत्रित झळकणार आहेत. ही जोडी जाहिरातीतून पहिल्यादाच एकत्र येत आहे. त्यामुले आता ऐश्वार्या लवकरच पुनरागमन करणार हे आता सिध्द झाले आहे.

ऐश्वर्या-अभिषेक हे दोघेजण २५०० कोटींची उलाढाल असलेल्या टीटीके प्रेस्टीजचे ब्रॅण्ड अम्बेसेडर झाले आहेत.”जो बिवी से करे प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार” या अड कॅम्पेनने प्रेस्टीज पुर्नपदार्पण करत आहे, अशी कंपनीतील सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रेस्टीज हे एक किचन ब्रॅण्ड आहे. याचीच जाहीरात बॉलीवूड मधील ऐश्वर्या-अभिषेक ही फेमस जोडी करीत आहे.

‘गुरू’ या सिनेमातून एकत्र काम करणारे ऐश्वर्या-अभिषेकने सहा वर्षापूवी त्‍यांनी विवाह केला होतक. गेल्या तीन वर्षापासून अभिनेत्री ऐश्वर्याने सिनेमात काम करणे थांबवले होते. ब-याच दिवसानंतर या जाहिरातीच्या माध्य्मातून अभिषेक-ऐश्वर्या या बॉलीवूड दाम्पत्याची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे आता ऐश्वार्या लवकरच पुनरागमन करणार हे आता सिध्द झाले आहे.