आसाराम बापूंचा जमीन अर्ज फेटाळला

जोधपूर, – अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या मागे गेल्या काही दिवसांपासून लागलेले शुक्लंकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही असे दिसते. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंचा जामीन अर्ज मंगळवारी राजस्थान हायकोर्टाने फेटाळला. त्या मुळे त्यांपच्याच समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

बापूंच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारीच ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. आणि मंगळवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना आणखी काही काळ तुरूंगातच काढावा लागणार आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापूंना जोधपूर पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर जोधपूर न्यायालयाने बापूंना पोलिस कोठडीत धाडले होते.

त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. तर सोमवारी त्यांच्या न्यायलयीन कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अध्यात्मिक गुरू आसाराम बापूं यानी जामीनासाठी मंगळवारी राजस्थान हायकोर्टात अर्ज केला होता. त्यांसचा हा जामीन अर्ज राजस्थान हायकोर्टाने फेटाळला.