न्यूयॉर्क : पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात न्यूयॉर्कमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. पाकिस्ताननं दहशतवाद थांबवावा अशी मागणी मनमोहनसिंग यांनी शरीफ यांच्याकडे केली. तसंच मुंबई हल्ल्यातील दोषींना सजा, सियाचीन या मुद्यावरही दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली.
मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करू – शरीफ
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्यासाठी दोन्ही नेते सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार सीमेवर वारंवार होणारा गोळीबार तसंच काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं.
एवढंच नाही तर मनमोहनसिंग यांनी शरीफ यांना भारत दौर्याचंही निमंत्रण दिलं आहे. मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं भारताच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
