मुंबई – डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा 61 वर गेला असून 48 तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेले आहे. मात्र ढिगार्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींचा आकडा 30 वर गेला.
मुंबई इमारत दुर्घटनेचे 61 बळी
या प्रकरणी अशोक मेहता या डेकोरेटरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक मेहताने या इमारीतील काही भाग भाडेतत्वावर घेतला होता आणि या भागात त्यानं अनधिकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी महापालिकेची सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आठवड्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
