नवीन विषय आणि दज्रेदार मांडणी यात मराठी सिनेमाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. नवनवीन विषयांवर आणि वेगवेगळय़ा संकल्पनेचे चित्रपट मराठीत दिसू लागे आहेत. ७0-८0च्या दशकात हिंदी सिनेमात रूळलेला कॅब्रे हा नृत्य प्रकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कॅब्रे’ या नृत्य प्रकारात निपुण असणार्या कलाकारांवर गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये अमेरिकन स्टार ‘केट’ दिसणार आहे.
कॅब्रे मराठी सिनेमातही
मराठी सिनेमाकरिता हा संक्रमणाचा काळ असून अनेक निर्माती कंपन्या वेगवेगळय़ा आशयाचे सिनेमे प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटात पाश्चिमात्य संस्कृतीदेखील हळूहळू रूजू लागली आहे. आदिनाथ कोठारे याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॅलो नंदन’ चित्रपटात आता चक्क ‘कॅब्रे’डान्सवर मराठी रसिकांची पावले थिरकणार आहेत. अमेरिकन स्टार नृत्यांगना ‘केट’ हिच्यावर नुकत्याच एका गाण्याचे चित्रीकरण झाले. त्यामुळे मराठी सिनेमा देखील मागे नसल्याचे दिसून येत आहे.
