वॉशिंग्टन: आतापर्यंत पाकिस्ताबनने दहशतवाद्यी कारवायांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तानमध्ये आजही दहशतवाद्यांचे जाळे सक्रीय आहे. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याकडून आपल्याला याबाबत जास्त अपेक्षा नसल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकेतून ही प्रतिक्रिया दिली आहे.
मनमोहन सिंह यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेतली. जवळपास दीड तास मनमोहन सिंह आणि ओबामा यांच्यात बातचित झाली. यावेळी दोन्ही देशातील संबंधांवर चर्चा कऱण्यात आली असल्याचे समजते. यावेळी मनमोहन सिंग यांनी पाककडून जम्मू–काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सुरू असलेल्या दहशहतवादी कारवायांची माहिती दिली.
दरम्यान, ओबामांच्या भेटीनंतर शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिंह संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. या महासभेतील भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानच्या कुरघोड्यांबाबत काय भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.