जम्मूमधील पोलिस ठाण्यावर हल्ला; सात जण ठार

जम्मू- लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी जम्मूमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. या हल्लायात सातजण ठार झाल्याचे वृत्त आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मयतामध्ये पाच पोलिस जवान आणि एक नागरिकाचा समावेश असल्याचे समजते.

जम्मूमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर पोलिस ठाण्यावर लष्कराच्या गणवेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी सकाळी पावणे सातच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात पोलिस ठाण्यारतील पाच पोलिस जवान व एका नागरिकाचा मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या ट्रकचालकास ठार मारुन हे दहशतवादी त्या ट्रकमधून पसार झाले.

यानंतर जम्मू-पठानकोट महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिस चौकीवर हल्ला करणा-यांना शोधण्यासाठी नाकाबंदी केलेली असतानाच दुसरीकडे जम्मूतील सांबा येथील सैन्य दलाच्या तळावरही दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समजते. सैन्याचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही येथे चकमक सुरू आहे. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.