मोहाली – चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पहिली लढत मंगळवारी मोहाली येथील त्रिनिदाद अँड टोबॅगोविरुद्ध होईल. सनरायझर्सने क्वालिफायरचे दोन सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. हा सामना आठ वाजता सुरू होणार आहे.

ब्रिस्बेन हिटला पराभूत केल्यानंतर त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. या सामन्यात कॅरेबियन संघाला फक्त १३५ धावा काढता आल्या होत्या. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी शानदार बचाव करताना संघाला विजयश्री मिळवून दिली. रवी रामपॉलने १४ धावांत ४ विकेट, तर सुनील नरेन आणि राड एमरिटनेसुद्धा उत्कृष्ट शानदार गोलंदाजी केली. दिनेश रामदिनने कर्णधारपदाची खेळी करताना शानदार फलंदाजी केली.
सनरायझर्सकडे शिखर धवनशिवाय जे. पी. डुमिनी, पार्थिव पटेल, कॅमरून व्हाईट आणि हनुमान विहारीसारखे दिग्गज फलंदाज आहेत. हैदराबादची गोलंदाजी मजबूत आहे. हीच त्यांची उजवी बाजू आहे. गोलंदाजीत हैदराबादकडे डेल स्टेन, इशांत शर्मा, थिसारा परेरा, अमित मिश्रा आणि डॅरेन सॅमीसारखे गोलंदाज आहेत. सॅमी, मिश्रा आणि परेरा गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयोगी ठरू शकतात. ब गटात टायटन्स आणि ब्रिस्बेन हिट यांच्यात मंगळवारी दुपारी सामना होईल. या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला होता. टायटन्सला स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ब्रिस्बेन हिटला त्रिनिदाद अँड टोबॅगोने २५ धावांनी नमवले होते.