कृष्णा खोरे विकास महामंडळाचा अहवाल गायब

पुणे- कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा उघड झाला होता. या प्रकरणाची चौकशी केल्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यायमुळे आता हा अहवाल कुठे गायब झाला याचा शोध प्रशासनकाडून घेतला जात आहे.

युती सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या कृष्णा खोरे महामंडळात हजारो कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करुन १९९९ मध्ये अहवाल सरकारला दिला. मात्र गेल्या १४ वर्षात हा अहवाल गायब झाल्याने कोणतीही कारवाई झाली नाही.आरटीआय कार्यकर्ते पोपट कुरणे यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला. मात्र त्यात यश मिळाले नाही.

त्यानतर पोपट कुरणे यांनी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर चौकशी अहवाल गायब झाल्याची बाब उघड झाली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. तसेच ३१ ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनाच पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Comment