मनसेच्या माजी नगरसेविका कल्पना बहिरट यांना अटक

पुणे, – बनावट जात प्रमाणपत्राद्वारे निवडणूक लढविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका कल्पना दिलीप बहिरट (रा. 428, मंगळवार पेठ) यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने यापूर्वीच बहिरट यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. बहिरट निवडून आलेल्या प्रभागामध्ये फेरनिवडणूकही झाली आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 मध्ये प्रभाग क‘मांक 40 (अ) मधून मनसेकडून बहिरट यांनी लढविली. या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन बहिरट विजयी झाल्या. त्यानंतर ही निवडणूक लढवताना बहिरट यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले. त्यानंतर बहिरट यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या तपासात बहिरट यांनी 50 हजार रुपये देऊन पांडुरंग दगडू खोमणे (रा. 212, भगत वस्ती सदनिका क‘मांक 23, भोसरी) यांच्याकडून बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनवून घेतले. ते बनावट प्रमाणपत्र वापरून निवडणूक लढवून निवडणूक आयोग आणि शासनाची मसवणूक केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी बहिरट यांना अटक केली.

महापालिकेचे ढोलेपाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी संदीप शंकर ढोले (वय 32) यांनी याबाबत मिर्याद दिली आहे. दरम्यान, बहिरट यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी 10 हजार रुपयांचे कॅश डिपॉझिट, तपासात सहाय्य करायचे आणि परदेशात जायचे नाही, या अटींवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी 15 हजार रुपयांचा जामीन बहिरट यांना मंजूर केला आहे.