पोलीस आणि राजकारणीच अंधश्रध्देचे बळी – बाबा आढाव

पुणे, – राज्यकर्ते आणि पोलीस हेच खर्‍या अर्थाने अंधश्रध्देचे बळी आहेत. प्रत्येक राजकारणी आणि पोलिसांच्या हातात गंडा असतो तर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ ’ंदिर असते. त्यामुळेच अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यास पकडण्यास पोलीस अपयशी ठरत आहेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीही डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या पार्श्‍वभूमीवर अंनिसच्या वतीने शनिवारी धारातीर्थ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी धारातीर्थ होऊन यावेळी संताप व्यक्त केला. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहेम ‘ना गोली से, ना तलवार से, हम लढेंगे विचार से अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या. यानंतर धरणे आंदोलनाचे रूपांतरण सभेत झाले, त्यावेळी आढाव बोलत होते. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेत एन.डी. पाटील, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, अंनिसचे नवर्निवाचित अध्यक्ष अविनाश पाटील, दीपा लागू, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर, सुभाष वारे, राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे, अभय जोशी यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.

आढाव म्हणाले, डॉ. दाभोलकर पुण्यात आले आहेत. सकाळी ओंकारेश्‍वर मंदिरासमोरील पुलावर मिरायला जाणार आहेत. या गोष्टी मारेकर्‍यांना कळतात. मात्र, या गोष्टीचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ आहेत. राज्याचे गृहमंत्री संयम ठेवा सांगतात. मात्र, जोपपर्यंत मारेकर्‍यांचा शोध लागत नाही, तोपर्यंत मानधन स्वीकारणार नाही, असे म्हणत नाहीत. एवढे म्हणण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. परिवतर्नासाठी सामुहिक सत्याग‘हाची तयारी नागरिकांनी ठेवावी. त्यासाठी तुरूंगवास भोगायलाही तयार असले पाहिजे. पुरोगामी चळवळीला गती आणली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यकर्ते विवेकवादी नाहीत, विज्ञानवादी नाहीत, समाजाने त्यंाच्याकडून परिवर्तनाची अपेक्षा करू नये. प्रत्येकाने प्रयत्न केल्यास सध्या निर्माण झालेली स्थिती सुधारेल . राज्यातील विविध महाविद्यालयात जाऊन परिवर्तनासाठी, पुरोगामी चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना साद घालणार आहे. 23 सप्टेंबर रोजी इस्लामपूर येथून या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे. असे एन.डी.पाटील यांनी यावेळी सांगितले.

विवेकाची लढाई आपण वर्षानुवर्षे लढत आलो आहोत. राज्यकर्ते कधीही बदलणार नाहीत. त्यामुळे या लढाईत सामान्य माणसापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. सामान्य माणसाला जागृत करून घोषणाबाजी न देता, असहकार न करता सत्ता उलटून लावता येते. मात्र, यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावा लागतो.
– डॉ. हमीद दाभोळकर •ायाचित्रात बोलताना प्रा. अजित अभ्यंकर शेजारी प्रा. एन डी पाटील आणि बाबा आढाव, दुसर्‍या छायाचित्रात या प्रसंगी डॉ दाभोळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा खून झालेल्या ठिकाणी आडवे पडून त्यांच्या खुनाच्या मारेकर्‍याला शोधण्यात होत असलेल्या विलंबाबाबत निषेध व्यक्त केला.