निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी

मुंबई: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यालसाठी आतापासूनच दोन्ही पक्षाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेसाठी दोन्ही पक्षाने आतापासूनच जागावाटपाची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईत कामगार आणि सर्व भाषिक श्रमजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रसवादीचे सर्वेसर्वा तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक मंत्री, पदाधिका-यांची फौज या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसही शनिवारपपासून आपला गड असलेल्या विदर्भातून राज्यव्यापी वचनपूर्ती जनजागरण यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांचा फौजफाटा विदर्भात असणार आहे.

त्यामुळे आगामी निवडणूकांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये मतांची गोळाबेरीज सुरु झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूकीच्या जागा वाटपात दोन्हीा पक्षाकडून वेगवेगळा फार्म्यू ला सांगीतला जात असला तरी दोन्हीव पक्षात शेवटी त्यांाच्या त आघाडी होणार आहे.