करीना होणार पुन्हा एकदा बेगम

वर्षभरापूर्वीच अभिनेता सैफ अली खान सोबत विवाह करून करीना कपूर बेगम झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मोठया पडद़यावरती करीनाला बेगमची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळात येत असलेल्या दिग़दर्शेक तिग्मांशू धुलिया यांच्या ‘बेगम सुमरू’ या सिनेमात करीना बेगमची भूमिका करणार आहे.

याआधी तिग्मांशू यांनी ‘बेगम सुमरू’ या सिनेमासाठी राणी मुखर्जीला बेगमच्या भूमिकेसाठी साईन केले होते. मात्र तारखा जुळत नसल्यामुळे राणीने या सिनेमात भूमीका करण्यास नकार दर्शविला होता. त्या मुळेच आता तिग्मांशू यांनी या बेगमच्या रोलसाठी करीनाशी संपर्क साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून करीना लंडनमध्ये बिजी आहे. तेथे सैफच्या ‘बुलेट राजा’ या सिनेमाचे शुट सुरू आहे. हा सिनेमादेखील तिग्मांशू धुलिया यांचा आहे. म्हणून करीनाच्या या चित्रपटाविषयी चर्चा केली जात आहे. खरं तर या चित्रपटात बेगमची भूमिका करीनानेच करावी, अशी तिग्मांशू यांची इच्छा आहे. मात्र करीनाने अद्याप आपला होकार दिला नाही. लंडनहून परतल्यावरच ती निर्णय घेणार असल्याचे समजते.

Leave a Comment