नाशिक – गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्याा दरवाढीमुळे ग्राहक त्रस्ते झाले आहेत. सध्या् कांदा बाजारात तब्बल ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक किंवा नाशिक जिल्ह्यातून कांद्याचे आवक मंदावल्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणा-या कांद्यावर दरवाढ अवलंबून असणार आहे. त्यारमुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याची प्रतीक्षा केली जात आहे.
गेल्या वर्षी राज्यापत आलेल्या दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन घटले होते. सध्या तर जळगावसह नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड आदी भागातून जळगाव आणि भुसावळ परिसरात कांद्याची होणारी आवक मंदावली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव चांगलच वधारले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने नवीन कांदा काढणे अवघड जात आहे.
यामुळे मोठे व्यापारी व ठोक विक्रेत्यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून कांद्याची आयात सुरू केली. मात्र, आवक कमी आणि मागणी वाढल्याने अडीच ते तीन महिन्यांपूर्वी फक्त २० रुपये किलोने मिळणारा कांदा आता तब्बल ७५ रुपये किलोपर्यंत पोहचाला आहे. जुलैपासून ते १५सप्टेंबरपर्यंत कांद्याचे भाव दर किलोमागे ६० रुपयांनी आहेत. दुसरीकडे गगनाला भिडलेला कांदा पाहता काही शेतक-यांनी घरगुती वापरासाठी साठवून ठेवलेला कांदाही बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
दरम्यान, कांद्याचे ठोक भाव पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल आहेत. मात्र, वाहतूक खर्च निघण्यासाठी बाजारात किरकोळ विक्री ६० ते ७५ रुपयांनी होते. महिनाभराच्या अंतराने कांद्याचे दर किलोमागे २५ रुपयांनी वाढल्याने थाळीतून कांदा हद्दपार झाला आहे.