हृतिक घेणार लवकरच सुझान पासून घटस्फोट

बॉलीवूडचा स्टार अभिनेता हृतिक त्याची पत्नी सुझान खान यांच्यातील वाद गेल्याय काही दिवसांपासून विकोप्याला गेला आहे. त्यामुळे त्यांनी आगामी काळात वेगळे होण्याचा निर्णय घेतला आसल्याची माहिती जवळच्या सूत्रांनी दिली. हृतिक गेल्यात काही दिवसांपासून जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवित असल्या कारणाने या दोघामध्ये बिनसले आहे.

हृतिक व त्याची पत्नी सुझान सुमारे दशकभरापेक्षा जास्त काळापर्यंत आनंदाने वैवाहिक जीवन जगल्यानंतर हृतिक आणि सुझान खान यांच्यात मतभेद निर्माण झाले असून,हे दोघे घटस्फोट घेऊन लवकरच विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जास्तकाळ हृतिक घराबाहेर असतो. हे हृतिकचे वागणे सुझानला खटकले आहे.
दरवर्षी गणपती विसर्जनासाठी सुझान सहकुटुंब जुहू बिचवर हजेरी लावत असते.परंतु,यावर्षी रोशन कुटुंबाच्या गणपती विसर्जन कार्यक्रमालाही ती उपस्थित नव्हती. हृतिकच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या क्रिश सिनेमाचा सिक्वल असलेला ‘क्रिश-३’ लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असून, त्यानंतर हे दोघे विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दोघांमधील मतभेद इतके टोकाला गेले आहेत की, दोघेही एकमेकांची साधी चौकशीही करत नसल्याचे यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे. सुझानने हृतिकचे घर सोडले असून,ती आपल्या माहेरी राहात असल्याचे यासंबंधीच्या आधीच्या वृत्तात म्हटले होते. सुझानने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राकेश रोशन यांच्या वाढदिवसालाही हजेरी न लावल्यामुळे या चर्चेने आणखीनच जोर पकडला आहे.