
चेन्नई – भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर हरियाणामध्ये नरेंद्र मोदींनी प्रचाराचं नवं रणशिंग फुंकलं. नवरात्रीनंतर उत्तर प्रदेशातही मोदी प्रचार करणार आहेत. त्याचसोबत दक्षिणेत भाजपचा प्रभाव वाढावा यासाठी भाजपने चक्क रजनीकांतला गळ घातली आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हा त्याच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाही. अशा रजनीकांतने जर नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला, तर भाजपला दक्षिणेत बहुमत मिळू शकेल. त्यामुळे भाजप सध्या रजनीकांतचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी निवडणुकीत रजनीकांतने नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करावा, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली आहे. मात्र दक्षिणेतील ज्येष्ठ भाजप नेते एल. गणेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून अधिकृतपणे रजनीकांतला आमंत्रित केलेलं नाही.
