बिल गेटस यंदाही सर्वाधिक श्रीमंत अमेरिकन

फोर्बस ने जाहीर केलेल्या ४०० सर्वाधिक श्रीमंतांच्या वार्षिक यादीत यंदाही मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांनी प्रथम स्थान मिळविले असून ते सलग २० व्या वेळी या यादीत अव्वल राहिले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या अतिश्रीमंतांची श्रीमंती वाढल्याचेही दिसून आले आहेच पण त्यात तरूणांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे. फोर्बसच्या आकडेवारीनुसार या श्रीमंतांची संपत्ती गतवर्षीपेक्षा १९ टक्कयांनी वाढली असून ती गतवर्षीच्या १.७ ट्रिलियन डॉलर्सवरून २.०२ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.

या यादीत अग्रभागी असलेले ५७ वर्षीय बिल गेटस यांची संपत्ती ७२ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यांच्या पाठोपाठ दोन नंबरवर वॉरन बफेट आहेत. बफेट यांची संपत्ती ५८.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. या वेळी या चारशे जणांच्या यादीत सरासरी वय ६६ वर्षे आले असल्याचे फोर्बसचे वरीष्ठ पत्रकार केरी डोलन यांनी सांगितले. यादीतील ३२ जण ४८ वयाचे आहेत. तरूणांची संख्याही लक्षणीय असून त्यात फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग, डेल कॉम्प्युटर्सचा मायकेल डेल, याहूचा जेरी यांग यांचा समावेश आहे.

अतिश्रीमंतांच्या यादीत असलेल्या तरूणात देगण्या देण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.