नोकियाच्या फॅब्लेटचे लॉचिंग रखडणार

सप्टेंबरच्या अखेरी नोकिया कडून सादर केले जाणार्याड फॅब्लेट व पाच इंची स्क्रीनच्या स्मार्टफोनचे लॉचिंग अनिश्चित काळापर्यंत लांबले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नोकियाने या महिन्यातच मायक्रोसॉफ्टला आपला हँडसेट विक्रीचा व्यवहार केला आहे. ७.२ अब्ज डॉलर्सच्या हा व्यवहार झाल्यामुळेच नोकियाची या महिन्यात सादर होणार असलेली ही दोन उत्पादने बाजारात सध्या तरी आणली जात नसल्याचे सांगितले जात आहे.

ल्युमिया स्मार्टफोन नंतर नोकिया फ्लॅब्लेट व पाच इंची स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत होते. न्यूयॉर्कमध्ये या महिन्यात ही दोन्ही उत्पादने सादर केली जाणार होती. मायक्रोसॉफट आणि नोकिया यांच्यात विक्री व्यवहार झाला असला तरी अद्यापी या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणेच व्यवसाय करत आहेत. सॅमसंगने फॅ ब्लेट विक्रीत आघाडी घेतली आहे तर टॅब्लेट विक्रीत अॅपल आघाडीवर आहे.