लेह अजूनही रम्य, शांत आहे

लेह – लोक पर्यटनासाठी एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा तिथे आपल्या मनाला शांतता लाभावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण सध्या पर्यटन स्थळे इतकी गजबजून जायला लागली आहेत की, तिथे शांतता अभावानेच आढळते. काही ठिकाणी तर पर्यटकांची आणि भाविकांची एवढी गर्दी असते की, इथे आल्यापेक्षा घरीच राहिलो असतो तर बरे झाले असते असे वाटून जाते. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेह हे ठिकाण मात्र पर्यटकांच्या मन:शांतीच्या सार्‍या अपेक्षा पूर्ण करू शकेल असे आहे. तिथे पर्यटकांचा, दुकानदारांचा आणि एजंटांचा गलबला नाही.

leh

समुद्र सपाटीपासून ११ हजार ङ्गूट उंचीवर वसलेले हे ठिकाण निसर्गाचे खास वरदान लाभलेले आहे. निळे निळे आकाश आणि त्या आकाशावर काढलेली चांदण्याची खडी हे स्वप्नातले दृश्य लेहमध्ये साकार होते. असे हे तारे आणि त्यातून अधून मधून तुटून पडणार्‍या चांदण्या बघताना लेहमधली रात्र अविस्मरणीय होऊन जाते.

leh1

लेहला सडकेनेही जाता येते आणि विमानानेही जाता येते. विमानाने जाण्यात सोय आहे. जम्मू, श्रीनगर किंवा दिल्लीवरून विमानाने उड्डाण घेतले की, काही मिनिटात लेह येते. परंतु रस्त्याने जाताना जास्त आनंद मिळतो. कारण रस्त्याच्या बाजूचे सृष्टी सौंदर्य न्याहाळत जाता येते. लेहवरून पुढे चांग ला पास या बर्ङ्गाच्छादित शिखरापर्यंत सामान्य प्रवाशांनाही जाता येते. १७ हजार ङ्गूट उंचीवर असलेले हे शिखर जगातल्या तिसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर मानले जाते. जिथे लष्कराचा तळ आहे आणि प्रवाशांना तिथे चहा मिळतो.

leh2

(फोटो सौजन्य – MakeMyTrip)

थ्रीड एडियटस् या चित्रपटाने लोकप्रिय केलेल्या पँगॉंग लेक या सरोवरापर्यंत या शिखरावरूनच जाता येते. या ठिकाणी पाण्याच्या निळाईच्या सात छटा पाहता येतात. याच भागातील १८ हजार ङ्गूट उंचीचे खारदुंग ला हे शिखर आहे. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथपर्यंत पर्यटकांना मोटारने जाता येते. लेहमध्ये लेह पॅलेस, शांती स्तूप, जामा मशिद ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्रीनगरपासून बसगाड्या सुद्धा लेहपर्यंत जातात.

Leave a Comment