मोदींनी अडवाणींचे आशीर्वाद घेतले

नवी दिल्ली – रामजेठमलानी यांच्याघरी नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भेट झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या हातात हात दिला, त्यानंतर अडवाणींचे पायापडून आशीर्वाद घेतले.

नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यावेळी 10 मिनिटं सोबत होते. नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यापासून लालकृष्ण अडवाणी नाराज आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनंतर नरेंद्र मोदी यांची ही झालेली भेट महत्वाची मानली जात आहे. मात्र लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी यामुळे खरोखर दूर होणार आहे किंवा नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Leave a Comment