मी आळशी – काजोल

आपल्या अभिनयाचा ठस्सा उमटवणारी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये स्थान निर्माण करणारी अभिनेत्री काजोलने आपण अतिशय आळशी अभिनेत्री असल्याचे प्रांजळपणे कबूल केले आहे. ही अभिनेत्री आता लवकरच मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे. या ३९ वर्षीय अभिनेत्रीने सन २00१ नंतर थेट २00६ मध्ये ‘फना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर तिने करण जाैहरच्या ‘वुई आर फॅमिली (२0१0) या चित्रपटात काम केले होते. आपण अतिशय आळशी असून मी सलग काम करू शकत नाही त्यामुळेच मध्ये-मध्ये ब्रेक घेते, असे काजोलने स्पष्ट केले आहे. एका वर्षाला दोन चित्रपट माझ्यासाठी पुरेसे असल्याचेही काजोल म्हणते. दरम्यान, अजय देवगणच्याच होम प्रोडक्शन निर्मित चित्रपटातून आपण बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे काजोलने म्हटले आहे.

Leave a Comment