
‘झपाटलेला २’ या थ्री ङी चित्रपटाने १०० दिवस पूर्ण केले आहेत. या निमित्ताने ‘झपाटलेला २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा मुंबईत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वळी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली.
दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासह आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. ‘झपाटलेला २’ या थ्रीडी चित्रपटाच्या यशानंतर ‘झपाटलेला ३’ चीही तयारी सुरु आहे. यात सोनाली-आदिनाथ झळकणार आहेत. या पाठोपाठ ‘पछाडलेला २’ ही लवकरच येणार असल्याचे कोठारे म्हणाले.
