मुजफ्फरनगर: मुझफ्फरनर दंगलीतील दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असून त्यांना सर्व काही मदत आगामी काळात देण्याचे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिले.

मुजफ्फरनगर: मुझफ्फरनर दंगलीतील दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असून त्यांना सर्व काही मदत आगामी काळात देण्याचे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यानी सोमवारी मुजफ्फरनगरचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मनामोहन सिंग यांनी आश्वासन दिले. यावेळी त्यांनी दंगलीतील जखमींची भेट घेतली. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तिघेही मुजफ्फरनगरमध्ये दाखल झाले होते.
मुजफ्फरनगर पोहोचल्यानंतर पंतप्रधान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आधी बसीकला गावातील एका कॅम्पचा दौरा केला. हिंसाचारानंतर अनेक नागरिकांनी याठिकाणी आश्रय घेतला आहे.मुझफ्फरनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या दंगलीत ४७ जणांचा मृत्यू झाला होता. ४३ हजारांपेक्षी अधिक नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वीच दंगलीत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.