अपंग तरुणीवर सामूहिक बलात्कार

भिवंडी – तिघा नराधमांनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रकार नुकतीच उघडकीस आला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे रविवारी घडली. पिडीत तरुणी ही अपंग असून नारपोली पोलिसांनी या प्रकरणातील तिघा नराधमांना अटक केली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीने सोमवारी तक्रार दाखल केली.

भिवंडीतील नारपोली येथे १९ वर्षीय पिडीत तरुणीने तक्रारीत म्हेटले आहे की, पिडीत तरुणी ही अपंग असून सहा आठवड्यांपूर्वी तिघा नराधमांनी तिचे अपहरण करुन टेंपोतून अंजूर फाटा येथील निर्जनस्थळी नेले. यानंतर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेची वाच्याडता केल्यानस जीवे मारण्यारची धमकी देखील तिघा आरोपीने दिली होती.

या पीडित तरूणीने तक्रार दाखल केल्या नंजर पोलिसांनी या प्रकरणाती तिघा नराधमांना अटक केली आहे. या प्रकरणातील हे तिघे नराधम २७ ते ३५ वर्षाचे असल्याचे वृत्त असून अद्याप त्यांचे नाव समजू शकले नाही.