आसाराम बापूंच्या् कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

जोधपूर : अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने कोर्टात हजर केले असता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे आसाराम बापूंचा जेलमधील मुक्काम आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. आसाराम आणि त्यांचा सेवक शिवा या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आसाराम यांना ३१ ऑगस्टला रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आसाराम यांना सुनावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने जोधपूर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला. आसाराम आणि त्यांचा सेवक शिवा या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आसाराम यांचासेवक शिवा याच्या मोबाइलमध्ये आसारामच्या अनेक कृष्णलीला कैद आहेत. तसेच तो आसाराम यांच्यासाठी मुली पुरवण्याचेही काम करायचा असा जोधपूर पोलिसांचा आरोप आहे.