पुणे – पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या बारामती लोकसभा निवडणुकीत सध्याच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्याची तयारी शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांनी दाखविली असल्याचे आमदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. ते म्हणाले की या बाबत भाजप सेना व रिपब्लीकन महायुतीत विचार सुरू आहे. कीर्तिकर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत.
विजय शिवतरे हे सासवडचे सेनेचे आमदार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात सुळे यांच्याबाबत लोकांचा अपेक्षा भंग झाला असून त्यांच्याविरोधात लोक नाराज आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विजयाची महायुतीला संधी आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले की जागा वाटपाचा निर्णय महायुतीच्या वरीष्ठ पातळीवरील नेते घेणार आहेत हे खरे असले तरी शिवतरे यांचे म्हणणे आम्ही वरीष्ठांपर्यतं पोहोचविणार आहोत.