जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा तपास ’एनआयए’कडे द्यावा – हिमायत बेग

पुणे – जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी हिमायत बेग याने या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली असून हे प्रकरण एनआयएकडे सोपवावी अशी विनंती त्याने उच्च न्यायालयाकडे केली आहे.

उच्च न्यायालयाच्या निबंधकास पत्र लिहून त्याने ही मागणी केली आहे. या प्रकरणात आपणाला चूकीने गोवल्या गेल्याचा आरोप बेगने केला आहे. महाराष्ट्र एटीएसने माझ्याकडून जबरदस्तीने कबूलीजबाब लिहून घेतल्याचा आरोपही त्यांने या पत्रात केला आहे.

हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी या अगोदरच फाशीची शिक्षा सुनावली आहे. आयएमचा म्होरक्या यासीन भटकळला अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक गोष्टी नव्याने समोर येत आहेत. यामध्ये जर्मन बेकरी स्फोटात हिमायत बेगचा काहीच संबध नसल्याचे स्पष्ट केले होते. तर या स्फोटाच्या वेळी भटकळ सोबत कातील सिद्दीकी होता असे दिल्ली आणि बंगलुरु पोलिसांचे म्हणणे आहे.