रांजणगांवचा महागणपती

rangangaon

रांजणगांवच्या महागणपतीचे मंदिर पेशवेकालीन असून पेशव्यांचे सरदार किणे यांनी ते बांधले असे सांगतात. मात्र गर्भगृह थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे द्वार प्रचंड मोठे असून द्वारातच जय विजय यांच्या मूर्ती आहेत. दक्षिणायनाच्या काळात सूर्याची किरणे मूळ मूर्तीवर पडावीत अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम केले गेले आहे.

Ranjangaon-MahaGanapati

महागणपतीची मूर्ती बैठी असून दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धी आहेत. डाव्या सोंडेचा हा गणेश आहे. मात्र स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही मूळ मूर्ती नाही. मूळ मूर्ती लपवून ठेवलेली असून ती भुयारात आहे. मूळ मूर्ती दहा सोंड आणि वीस भुजा असलेली आहे. मंदिराच्या आवारात आजही जुन्या मंदिराचे खांब दिसतात. जुने मंदिर ९ व्या व १० व्या शतकात बांधले गेले होते असे पुरावे उपलब्ध आहेत. या स्थानाचे महात्म्य असे की या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान  महादेवांनाच गणेशाचा वर मिळाला.त्रिपुरासुराचा नाश करणे शंकर भगवानांना जमेना त्यावेळी त्यांनी षडाक्षरी मंत्र जपला आणि गणेश जागृत झाला. गणेशाने त्रिपुरासुराचा वध कसा करायचा याचे ज्ञान शंकरांना दिले. त्यानुसार सहस्त्रनाम घेऊन शंकरांनी बाण सोडले आणि त्रिपुरासूर ठार झाला. त्यावेळी या स्थानाला मणीपूर असे संबोधले जात होते.

Ranjangaon-MahaGanapati1

थोरले माधवराव पेशवे यांनी मूर्तीभोवतीचा दगडी सभामंडप १७९० मध्ये बांधला आहे. पुणे नगर  हायवेवर पुण्यापासून ५० किमीवर अंतरावर हे गांव आहे. रांजणगांवचा महागणपती हा अष्टविनायकातला शेवटचा आठवा गणपती आहे. मात्र त्याचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मोरगांवला जाऊन पहिला गणपती मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतरच अष्ट विनायकाची यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते.

 

Leave a Comment