सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर यांच्या पडद्यावरील जोडीला प्रेक्षकांना फारसे पसंत केलेले नाही. असे असले तरी सैफ व करिना यांच्या जोडीच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. या दोघांनी आतापर्यंत बर्याच चित्रपटांतून एकत्र काम केले आहे, पण त्यातील एकालाही घवघवीत यश मिळालेले नाही. तरीही आगामी हॅप्पी एंडिंग चित्रपटात करिना-सैफची जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. मात्र या चित्रपटात सैफची नायिका करिना नाही तर इलियाना डीक्रूज असणार आहे. करिनाने त्यामध्ये फक्त एक आयटम सॉँग केले आहे.
हॅप्पी एंडिंग एक रोमॅटिंक कॉमेडीपट असून पुढच्या वर्षी तो प्रदर्शित होईल. या चित्रपटात सैफ फक्त नायकच नाही तर त्याच्या निर्मितीतही त्याचा सहभाग आहे. म्हणूनच त्याने आग्रह करून एका आयटम साँगसाठी आपल्या बेगमला राजी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ व करिना बर्याच दिवसांनी पडद्यावर एकत्र येणार आहेत. सध्या लॉस एंजेल्समध्ये या चितट्राचे चित्रण सुरू आहे. एजंट विनोदमध्ये त्यांची जोडी शेवटी दिसली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजिबातही प्रभाव दाखवू शकला नव्हता.
वास्तव जीवनात त्यांची जोडी लोकांना चांगलीच भावते, पण पडद्यावर त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. आता ते पती-पत्नी झाल्याने या नात्याचा फायदा उचलण्यासाठी वेगळय़ा पद्धतीने करिनाचे आयटम सॉँग चित्रित केले जाणार आहे. हे गाणे चक्क पाईपलाईनमध्ये चित्रित केले जाणार असल्याचे कळते. करिनाने आपल्या वाट्याची दृश्ये पूर्ण केली असून आयटम साँगचे चित्रण अजून बाकी आहे. बोस्कोने या गाण्यासाठी नृत्याचे धडे दिले आहेत. करिनाने आजवर जेवढे आयटम साँग केले आहेत, ते सगळे हिट ठरले आहे. आता आपल्या पतीच्या चित्रपटात ती काय रंग दाखवते व कोणती कमाल करते, ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच दिसेल.
—