मुंबई-गोवा महामार्गावर सीसीटीव्हीचा वॉच

मुंबई- आगामी काळात गणेशोत्सामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर नियंत्रण राहावे यासाठी रायगड हद्दीत १६ ठिकाणी एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गौरी-गणपती सणासाठी या मार्गावरील वाहतूक वाढणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सुत्रांने दिली.

आगामी काळात होत असलेल्या गौरी-गणपती सणासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण राहावे यासाठी रायगड हद्दीत १६ ठिकाणी एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गौरी-गणपती सणासाठी या मार्गावरील वाहतूक वाढणार असल्याने नेहमीच याठिकाणी वाहतूकीची कोंडी होती असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली असल्याची महिती पोलिसांनी दिली.

रायगड जिल्हा हद्दीत मुंबई-गोवा महामार्गवर खारपाडा, हमरापूर फाटा, चेण, खोपोली बायपास, अंतोरा, पेण चौकी, रामवाडी, वडखळ नाका, वाकण, कोलाडनाका, इंदापूर एसटी स्टँड, माणगाव, मोर्बानाका, लोणारे चौकी, नातेखिंड, विसावा हॉटेल, पोलादपूर या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमे-यातून होणारी वाहतूक रायगडचे पोलिस अधीक्षक, विभागीय पोलिस अधीक्षक तसेच ठिकठिकाणच्या पोलिस नियंत्रण कक्षातून पाहता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाय करता येणार आहे. तसेच रायगड महामार्ग प्राधिकरणाकडूनही खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी या महामार्गवर कोंडी होणार नसल्याची चर्चा आहे.